बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकपूर्व शिक्षण विभाग विभागाने शुक्रवारी द्वितीय पीयूसी पुनर्मूल्यांकनाचा निकाल आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला आहे.
उमेदवारांनी द्वितीय प्री युनिव्हर्सिटी कॉलेज (पीयूसी) पुनर्मूल्यांकनासाठी १४ ऑगस्ट पासून kseeb.kar.nic.in वर अर्ज केले होते. @ pue.kar.nic.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहेत.
कोरोना आणि लॉकडाऊनमुले राज्यात अर्धवट निकाल जाहीर झाल्यानंतर कर्नाटक माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाने (केएसईईबी) एसएसएलसी परीक्षा आयोजित केली आहे.
मुख्य परीक्षेच्या निकालानंतर पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली होती, आता विभागाने शुक्रवारी पीयूसी दोन चा पुनर्मूल्यांकन निकाल जाहीर केला आहे.