बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी बारावीची परीक्षा रद्द, तर दहावीची परीक्षा होणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले होते. दरम्यान पीयूसी परीक्षा रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रथम पीयूसीच्या गुणांवर ग्रेड पद्धतीने निकाल देण्याची घोषणा केली होती. आता सरकार त्याऐवजी दहावीच्या गुणांचे मूल्यांकन करण्याचाही विचार करणार असल्याचे म्हंटले आहे.
शनिवारी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी विद्यापीठाच्या पूर्व शिक्षण विभागाला द्वितीय पीयूसी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना एसएसएलसीच्या गुणांचा विचार करण्यास सांगितले. द्वितीय पीयूसी ग्रेड १० वी आणि प्रथम पीयूसी परीक्षेच्या सरासरी गुणांवर आधारित असतील.
दरम्यान शुक्रवारी, द्वितीय पीयूसी परीक्षा रद्द करण्यात आल्या आणि फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या प्रथम पीयूसी परीक्षेच्या कामगिरीवर विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले जावे असे म्हंटले होते. आता १० वी च्या गुणांचाही विचार केला जाणार आहे.