बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये कोरोनाचे प्रमाण घटत चालल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळत आहे. सध्या राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी कमी होत आहे. यातच मंगळूरमधील एका खासगी नर्सिंग कॉलेजने कोरोना टेस्ट केलेल्या ४० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नर्सिंग कॉलेजमध्ये भीतीचे वातावरण आहे. याचबरोबर प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.
दरम्यान हे सर्व विद्यार्थी मंगळूर येथील एका खासगी नर्सिंग कॉलेजमध्ये शिकण्यासाठी आलेले केरळमधील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. सध्या उल्लाळ येथील या महाविद्याल सील करण्यात आले आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या महाविद्यालयाला भेट दिली व तो भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे.