बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात शनिवारी नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दोन हजारांपेक्षा कमी होती. राज्याच्या आरोग्य विभागाने राज्यात १,७८१ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याचे सांगितले. तर राज्यातील विवविध जिल्ह्यात १,७९९ रुग्ण कोरोनावर मत करत घरी परतले. राज्यात आतापर्यंत एकूण ८,७१,३४२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत ८,३४,९६८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यात २४,७१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाने आतापर्यंत ११,६४१ रूग्णांचा बळी घेतला आहे. यापैकी २० जणांचा मृत्यू शनिवारी झाला आहे.
राज्यात या घडीला आयसीयूमध्ये ४९४ रुग्ण दाखल आहेत. गेल्या २४ तासात राज्यात १,२५३३७ कोरोना नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. तर राज्यात सकारात्मकतेचा दर १.४२ टक्के होता. राज्यात कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ९५.८२ टक्के आणि मृत्यूचे प्रमाण १.३३ टक्के आहे.
बेंगळूर शहरी जिल्ह्यात शनिवारी नवीन रूग्णांची संख्या ९७२ होती. तर जिल्ह्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत मृतांची संख्या ४,०५८ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३,६२,६२६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ३,४०,७५५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर जिल्ह्यात १७,८१२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.