बेंगळूर/प्रतिनिधी
र्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत सिद्धरामय्या हे कॉंग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील असे म्हंटले होते. तसेच काँग्रेसच्या अन्य काही नेत्यांनीही अशी मागणी केली होती. यांनतर कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी पक्षाचे अध्यक्ष सर्वोच्च आहेत. नेत्यांनी त्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना व आदेश पाळले पाहिजेत, असे ते म्हणाले.
“जोपर्यंत कॉंग्रेसचा प्रश्न आहे तोपर्यंत प्रदेशाध्यक्ष हे सर्वोच्च आहेत, डीके शिवकुमार, दिनेश गुंडू राव किंवा मी असो, अध्यक्ष आमच्या पक्षात सर्वोच्च असतील. प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार जे काही बोलतील तेच त्यांचे मत आहे ते जे काही बोलतात ते हाय कमांडच्या परवानगीनेच बोलत असतात, असे परमेश्वर म्हणाले.
“पार्टी हाय कमांडने डी. के. शिवकुमार यांना परवानगी दिली आहे, आजपर्यंत कॉंग्रेसमध्ये गटबाजी नाही. जर काही मुद्दे उपस्थित केले गेले, तर पक्ष उच्च कमांड त्यांना दूर करेल, ”असे ते म्हणाले. सोमवारी कर्नाटकचे प्रभारी एआयसीसी सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनी २०२३ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांवर निवेदने देण्याचा इशारा दिला होता.
“मी काळजीपूर्वक नमूद केले आहे की कॉंग्रेस पक्षातील काही लोक अलीकडेच राज्यात नेतृत्व किंवा कॉंग्रेसचे सरकार स्थापनेनंतर नेतृत्त्वाविषयी वक्तव्ये करत आहेत. अशा प्रकारच्या टिप्पण्या पूर्णपणे टाळण्यासाठी मी त्यांना पूर्वसूचना देत आहे, ”असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.