बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यातील सरकारी डॉक्टरांनी पगार वाढीच्या मागणीसाठी कर्नाटक सरकारचे त्यांच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी १५ सप्टेंबर पासून संपावर संपावर जाण्याचा विचार केला आहे. तसेच केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या प्रमाणात वाढ करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
वेतनश्रेणीत असमानता दर्शवित कर्नाटक गव्हर्नमेंट मेडिकल ऑफिसर असोसिएशनचे (केजीएमओए) अध्यक्ष डॉ. जी.ए. श्रीनिवास यांनी आम्हाला वैद्यकीय शिक्षण विभागातील डॉक्टरांप्रमाणे किंवा केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांच्या प्रमाणात समान पगार मिळायला हवा. सेवेतील इतर डॉक्टरांच्या तुलनेत आमच्या वेतनमानात असमानता आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनी देशभरात कोरोना संसर्ग असल्याचे नमूद करून वारंवार मागणी करूनही याकडे लक्ष दिले नाही, असा असोसिएशनचा आरोप आहे, तर केजीएमओएनेही अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये पुरेशी सुविधा नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.