कोप्पळ/प्रतिनिधी
कर्नाटकमधील कोप्पळ येथील व्यापारी श्रीनिवास मूर्ती यांनी आपल्या नव्याने बांधलेल्या घरात पत्नीचा सिलिकॉनचा पुतळा बसविला आहे.
जुलै २०१७ मध्ये त्यांची पत्नी माधवी यांचा कार अपघातात मृत्यू झाला होता. त्यांची आठवण म्हणून त्यांनी आपल्या नव्याने बांधलेल्या वास्तूमध्ये सिलिकॉनचा पुतळा बसविला आहे. आर्किटेक्ट महेश रंगनादवारू यांच्या मदतीने दिवाणखान्याच्या आत हा पुतळा बसविला गेला आहे.