बेंगळूर/प्रतिनिधी
प्रख्यात संस्कृत अभ्यासक बी. गोविंदाचार्य यांनी रविवारी उडुपी येथील अंबलपाडी येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. ते ८४ वर्षाचे होते. २००९ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. बी. गोविंदाचार्य वेद भष्य, उपनिषद भष्य, महाभारत, पुराण आणि रामायणात निपुण होते.
माधव विचारसरणीचे प्रचारक तसेच आध्यात्मिक गुरू म्हणून आदरणीय होते. गोविंदाचार्य यांनी पौराणिक ग्रंथांचा सखोल अभ्यास केला होता. वेदांशिवाय त्यांना उपनिषद, महाभारत आणि रामायण याबद्दल बरेच काही माहित होते. त्यांनी-हजाराच्या पृष्ठांची गीता कथा रचली आहे.