बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यातील परिवहन कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे. कर्मचाऱ्यांनी शनिवारीही हा संप कायम ठेवला. परिवहन महामंडळ कर्मचारी संप सुरू असल्याने बससेवा विस्कळीत झाली आहे. शनिवारी संपामुळे बेंगळूरमधील बेंगळूर महानगर परिवहन महामंडळ (बीएमटीसी) आणि राज्यभरातील कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (केएसआरटीसी) सेवाही विस्कळीत झाल्या आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या
परिवहन कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणी करत आहेत. त्यांना सरकारी कर्मचार्यांप्रमाणेच विशेषाधिकार किंवा प्रोत्साहन हवे आहेत आणि कोरोना कर्तव्यदरम्यान जीव गमावलेल्या परिवहन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ३० लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी आहे.
संपामुळे राज्यातील विविध भागातील तसेच लोक मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडले आहेत. कर्मचारी संपावर असल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. बेंगळूरमधील केम्पेगौडा बस टर्मिनस आणि बीएमटीसी बस अड्ड्यांवर बहुतांश बसगाड्या अजूनही बंद आहेत.