बेंगळूर / प्रतिनिधी
जागतिक बँकेने हुबली-धारवाड, बेलगावी आणि कलबुर्गी शहरांमध्ये सुरू असलेल्या कर्नाटक नागरी पाणी पुरवठा आधुनिकीकरण प्रकल्पाला 150 दशलक्ष डॉलरचा अतिरिक्त वित्तपुरवठा मंजूर केला आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट पाइपद्वारे पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवठा करणे आहे.
जागतिक बँकेने सध्या सुरू असलेल्या कर्नाटक शहरी पाणी पुरवठा आधुनिकीकरणास 150 दशलक्ष डॉलरचा अतिरिक्त वित्तपुरवठा मंजूर केला आहे. शहरी जल सुधारणांसाठी जागतिक बँकेची कर्नाटक सरकारसोबत भागीदारी 2004 मध्ये सुरू असून सुमारे 230,000 लोकांपर्यंत पाइपद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी राज्याला प्रथम सुमारे 52 दशलक्ष डॉलरचे सहाय्य देण्यात आले. या तीन प्रमुख शहरांपैकी : हुब्बळी-धारवाड, बेळगाव आणि कलबुर्गी यांचा समावेश आहे.