बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक विधानसभेच्या चालू हिवाळी अधिवेशनात गोवंश हत्या बंदी विधेयक मांडले जाईल, तर “लव्ह जिहाद” विरोधातील कायदा पुढील अधिवेशनात घेण्यात येईल, असे राज्याचे महसूलमंत्री आर. अशोक यांनी सोमवारी सांगितले.
या अधिवेशनात गोवंश हत्या बंदी कायदा करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे. गायीला शेतकरी देव मानतात. भारतीय संस्कृतीत गायीला एक विशेष स्थान आहे. गायीची हत्या थांबविण्यासाठी आम्ही कर्नाटकात हा कायदा लागू करीत आहोत, असे मंत्री अशोक म्हणाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी गोवंश हत्या बंदी विधेयक टक्केवारीत आणले जाईल याची शाश्वती आहे.
या अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधात विधेयक मांडले जाणार नाही. पुढील सत्रात आम्ही लव्ह जिहाद कायदा करू, असे ते म्हणाले. दरम्यान गोहत्या बंदी विधेयक कर्नाटकात लागू करण्यापूर्वी पशुसंवर्धन मंत्री प्रभू चव्हाण यांच्या नेतृत्वात अधिकाऱ्यांच्या पथकाने उत्तर प्रदेश आणि गुजरात येथे नुकतीच भेट दिली होती. तेथे गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीविषयी अभ्यास केला. या विधेयकाला सोमवारी सुरू झालेल्या अधिवेशनात बळकटी देण्याच्या उद्देशाने हा अभ्यास दौरा केला होता.