बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज बेळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. मुखयमंत्री येडियुरप यांनी आज निपाणीसह पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी यावेळी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, उपमुख्यमंत्री आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, महसूल मंत्री आर. अशोक, आमदार महांतेश कवठगीमठ मुख्यमंत्र्यांसोबत होते.
दरम्यान, माध्यमांशी बोलताना कर्नाटकचे महसूलमंत्री आर. अशोक यांनी रविवारी सांगितले की, उत्तर कर्नाटक प्रदेशात गेल्या दोन आठवड्यांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे हजारो लोक विस्थापित झाले आहेत आणि या भागात आतापर्यंत कमीतकमी ३१ हजार ३६० लोकांना हलविण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले. दरम्यान कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (केएसडीएमए) उपाध्यक्ष असलेले अशोक यांनी पत्रकारांना सांगितले की या प्रदेशात स्थापन झालेल्या २३७ मदत शिबिरांमध्ये २२,४१७ पेक्षा जास्त लोकांचे पुनर्वसन झाले आहे, असे ते म्हणाले.