बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक काँग्रेस लवकरच बेळगाव लोकसभा तसेच बसव कल्याण आणि मस्की विधानसभा जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांना पक्षाच्या उच्च कमांडकडे आपल्या शिफारसी पाठवणार असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी शनिवारी सांगितले.
पोटनिवडणुकीचे वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलेले नाही. बेळगाव लोकसभा आणि बसवकल्याण विधानसभा मतदार संघाबाबत मी नेत्यांची बैठक बोलावून त्यांच्या सूचना एकत्रित केल्या आहेत. लवकरच आम्ही मस्की विधानसभा मतदारसंघासह दोन जागांसाठी आपल्या शिफारसी हाय कमांडला पाठवू, असे ते म्हणाले.
पक्षाच्या नेत्यांसमवेत बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिवकुमार यांनी पार्टी हाय कमांड उमेदवार कोण असतील हे ठरवतील. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोरोनामुळे केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी आणि आमदार बी. नारायण राव यांच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा आणि बसवकल्याण विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक होणे आवश्यक असताना, आमदार प्रतापगौडा पाटील यांच्या अपात्रतेनंतर मस्की विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. २०१८ मध्ये आमदार प्रतापगौडा पाटील काँग्रेसकडून निवडणूक लढवून विजयी झाले होते. बंडखोरी करत ते आत भाजपबरोबर गेले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, माजी खासदार प्रकाश हुक्केरी आणि बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकरांचे भाऊ चन्नरज हत्तीहोळी यांची नावे बेळगावच्या जागेसाठी पुढे आली आहेत.
बसवकल्याणसाठी माजी मुख्यमंत्री (दिवंगत) एन. धरम सिंग यांचा मुलगा एमएलसी विजय सिंग आणि मल्लम्मा यांची नावे विचारात आहेत, असे ते म्हणाले. मस्कीसाठी, कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या एका गटाने असे सूचित केले आहे की अलीकडेच पक्षात सामील झालेल्या बसणगौडा तुर्विहाळ यांच्या नावाचा विचार केला जात आहे. तुर्कीहाळ, जे मस्की मधील भाजपचे उमेदवार होते, ते आता कॉंग्रेसच्या प्रथपगौडा पाटील यांच्याविरुद्ध २१३ मतांनी पराभूत झाले होते.