बेंगळूर/प्रतिनिधी
एका पोलीस जोडप्याने शुक्रवारी आत्महत्या केली. दरम्यान संपिगेहळ्ळी एसीपी कार्यालयाशी संलग्न असलेले सुरेश आणि कोथनूर पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल त्यांची पत्नी शीला यांनी शुक्रवारी कोथनूर येथील त्यांच्या घरी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
सुरेश यांची सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात नेमणूक करण्यात आली होती. तर त्याची पत्नी पोलीस नियंत्रण कक्षात काम करीत होत्या.
शुक्रवारी रात्री ते त्यांच्या निवासस्थानी लटकलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या जोडप्याचे लग्न होऊन १० वर्ष झाले होते. परंतु आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.