बेंगळूर/प्रतिनिधी
प्राप्तिकर विभाग कर्नाटकातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांवर छापे टाकत असल्याचे अहवालात म्हटले आहे. दरम्यान राज्यातील बेंगळूर, मंगळूर आणि दावणगिरी जिल्ह्यात ठराविक महाविद्यालयात छापे टाकले जात आहेत.
यावेळी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांसह आयटी अधिकारी बुधवारी सकाळी वैद्यकीय महाविद्यालयांच्या मालकांच्या संस्था, कार्यालये आणि निवासस्थानांचा शोध घेत छापेमारी केली जात आहे. प्राप्तिकर विभागाने बेंगळूरमध्ये दोन महाविद्यालयांवर छापा टाकला आहे.