बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी सोमवारी सांगितले की, १२ वीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल जुलैच्या दुसर्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. दरम्यान, अधिकारी व शैक्षणिक तज्ज्ञांशी झालेल्या बैठकीनंतर शिक्षणमंत्री म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने ३० जुलै पर्यंत १२ वीच्या बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले होते, त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा विचार करून राज्य सरकार जुलैच्या दुसर्या आठवड्यात निकाल जाहीर करेल, असे म्हंटले आहे.
त्यांनी आश्वासन दिले की निकालात कोणावरही अन्याय होणार नाही आणि निकाल पीयूसी -१ (इयत्ता ११ वी) आणि एसएसएलसी (इयत्ता १० वी ) परीक्षांमधील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या गुणांवर आधारित असेल. कुमार म्हणाले, “तज्ज्ञांनी नमूद केलेला हा निकष आहे. जर कोणताही विद्यार्थी निकालावर समाधानी नसेल तर ते पुन्हा परीक्षा देऊन हा निकाल देण्यास पात्र ठरेल,” कुमार म्हणाले. राज्यात पीयूसी परीक्षा कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे यंदा रद्द करण्यात आली आहे.
१ जुलैपासून कर्नाटक डीडी चंदनाच्या माध्यमातून चालू शैक्षणिक वर्षाचे धडे प्रसारित करण्यास सुरुवात करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. मंत्री म्हणाले की ८ वी ,९ वी आणि १० वीच्या वर्गांचे धडे १ जुलैपासून प्राधान्याने सुरु केले जातील.