नवी दिल्ली/प्रतिनिधी
“बिटकॉइन घोटाळा मोठा आहे पण त्याहीपेक्षा बिटकॉइन घोटाळ्याचे कव्हर-अप खूप मोठे आहे. कारण यात कोणाचा तरी खोटा मोठा अहंकार लपवायचा आहे.” असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले.
कोट्यवधी रुपयांचा कर्नाटकातील बिटकॉइन घोटाळा भाजप सरकारने दडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसने शनिवारी केला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली असलेल्या एसआयटीद्वारे या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आरोप केला की, हा घोटाळा मोठा आहे, पण त्यावर पांघरूण घालणे त्याहूनही मोठे आहे.