बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोनाची प्रकरणे वाढतच चालली आहेत. दक्षिण कन्नड जिल्ह्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यानंतर राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४३८९ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात कोरोनाचे १८० नवीन रुग्ण सापडले आहेत. तर राज्यात शुक्रवारी ५ हजाराहून अधिक रुग्ण सापडले आहेत.
शुक्रवार पर्यंत जिल्ह्यात कोरोनाची २५२७ सक्रिय प्रकरणे आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी कोरोना संसर्गामुळे सहा जणांचा मृत्यू झाला. यासह आतापर्यंत जिल्ह्यात ८९ लोकांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील २३९ रुग्णांना कोरोनातून बरे झाल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
कर्नाटकमध्ये कोरोनाचे दररोज नवनवे नवे विक्रमनोंदविले जात आहेत. सलग दुसऱ्या दिवशी राज्यात कोरोना प्रकरणात कायम राहिली. शुक्रवारी राज्यात गेल्या चोवीस तासात ५००७ नवीन रुग्णांची भर पडली. त्याच वेळी, बेंगळूरमध्ये कोरोनाचे २२६७ नवीन रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी राज्यात कोरोना-संक्रमित ११० रूग्णांचा मृत्यू झाला, त्यापैकी ५०बेंगळूर मध्ये मरण पावले.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात कोरोनाचे एकूण सक्रिय रुग्ण ५२७९१ पर्यंत वाढले आहेत . राज्यातील विविध जिल्ह्यांतील २,०३७ रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.तर बेंगळूरमध्ये ७४६ बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडले आहे. राज्यासाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.