बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी मंगळवारी, कर्नाटकमध्ये कोरोनाचे केंद्रबिंदू म्हणून बेंगळूर उदयास आले आहेत. त्यामुळे युद्धपातळीवर काम करण्याची गरज आहे.
बेंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना सुधाकर यांनी, “बेंगळूर हे कर्नाटकचे केंद्रबिंदू आहे. एकूण प्रकरणे पाहिल्यास बबेंगळूरमध्ये किमान ७० टक्के रुग्णांची नोंद झाली आहेत.” राज्यपाल वजुभाई वाला यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीवरील प्रश्नांची उत्तरे ते देत होते. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा या विषाणूची लागण झाल्याने आणि त्यांच्यावर उपचार सुरू असल्याने ते या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहतील.
मंत्री सुधाकर यांनी, कोविड प्रकरणात चिंताजनक वाढ झाल्यामुळे बेंगळूर आणि इतर सात जिल्ह्यांबाबत संवेदनशील विभाग म्हणून नेमण्यात आले आहे. सिद्धरामय्या, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, जद (एस) नेते आणि माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी या विरोधी नेत्यांनी केलेल्या विधायक सूचनांवर सरकार गांभीर्याने विचार करेल, असेही ते म्हणाले.