बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर महानगरपालिकेचे आयुक्त एन. मंजुनाथ प्रसाद यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे उल्लंघन करून शहरातील पद्मनाभनगर येथे असलेल्या एन.यू. हॉस्पिटलच्या प्रभारी आसमा बानो यांच्याविरूद्ध यांनी खटला चालविण्याचे आदेश दिले आहेत.
आयुक्त प्रसाद यांच्या माहितीनुसार रुग्णालय व्यवस्थापनाने खासगी रुग्णालयांना सरकारी कोविड रुग्णांच्या उपचारासाठी ५० टक्के बेड आरक्षित करण्याच्या सरकारच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. वारंवार सांगूनही रुग्णालये जर बेड आरक्षित करणार नसतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे म्हंटले आहे.
सरकारच्या नियमावलीनुसार रुग्णालयाने ५५ बेड सरकारी कोविड रूग्णांना देण्यात आलेले नाहीत. नियमांचं उल्लंघन केल्याचं उघडकीस आल्यानंतर रुग्णालय व्यवस्थापनाला समन्स बजावण्यात आले. पण त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. रुग्णालयाने ५० टक्के बेड उपलब्ध करुन देण्याच्या शासकीय निर्देशांचे पालन केलेलं नाही.
कोरोना रूग्णांना काही दिवसांपूर्वी ५० टक्के बेड उपलब्ध करून न दिल्याबद्दल बीबीएमपीने ३६ रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यामध्ये एनयू रुग्णालयाचे नाव समाविष्ट होते