बेळगाव/प्रतिनिधी
बेळगाव जिल्ह्यात २२ शिक्षकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. दरम्यान जिल्ह्यातील ७ हजारापेक्षा पेक्षा जास्त शिक्षकांचे नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी २२ शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे.
यामध्ये बेळगाव शहरातील चार, बेळगाव ग्रामीण भागातील दहा, रामदुर्गमधील तीन आणि कित्तूर तालुक्यातील एक शिक्षकाचा समावेश आहे. तसेच चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील चौघांचा समावेश असल्याचे उपायुक्त एम.जी. हिरेमठ यांनी सांगितले.
मंगळवारी पत्रकारांशी बोलताना उपयुक्त हिरेमठ यांनी सरकारच्या निर्देशानुसार शाळा व महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे विद्यागम उपक्रमही सुरू करण्यात आला आहे. हुक्केरी येथील दोन आणि चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील रायबागमधील दोन शिक्षकांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे.
दरम्यान शाळा व महाविद्यालये बंद करण्याची गरज नाही. वर्ग सुरू होण्यापूर्वी कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. ते सर्वजण असल्याचे असल्याचे आढळले. तसेच ते वर्ग घेण्यासाठी शाळेत गेले नव्हते, अशी माहिती उपयुक्त हिरेमठ यांनी दिली आहे.
दरम्यान सरकारी उच्च माध्यमिक शाळेच्या चार शिक्षकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यापैकी एकाने वर्ग घेतले होते. त्यामुळे शाळा आठवडाभरासाठी बंद राहणार आहे , असे ते म्हणाले.