बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमधील दोन विधानसभा जागांवर पोटनिवडणूक जिंकल्यानंतर सत्ताधारी भाजपने राज्यातील चार विधानपरिषदेच्या जागाही जिंकल्या आहेत. विधानपरिषदेच्या निवडणूकीसाठी २८ ऑक्टोबरला मतदान घेण्यात आले होते.
कर्नाटक पश्चिम, दक्षिणपूर्व पदवीधर मतदारसंघ, कर्नाटक ईशान्य आणि बेंगळूर शिक्षक मतदारसंघांत अनुक्रमे भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.
विधान परिषदेच्या विजयानंतर पाच वर्षात प्रथमच ७५ सदस्यीय विधानपरिषदेत भाजपा प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. विधान परिषदेत भाजप ३१ त्यानंतर कॉंग्रेस २८ आणि जद (एस) चार अपक्षांसह १४ जागांवर विजयी झाले आहेत.