बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक विधानपरिषदेत उपसभापती एस.एल. धर्मेगौडा यांना सभागृहात अध्यक्ष खुर्चीवरून बाजूला केल्यांनतर काही तासांनंतर मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मंगळवारी विधानपरिषद अध्यक्ष के. प्रतापचंद्र शेट्टी यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी केली. तसेच विधानपरिषद सदस्य मंत्री लक्ष्मण सावडी, बसवराज बोम्मई, आर अशोक, जे.सी. मधुसस्वामी आणि एमएलसी रमेश गौडा, बसवराज होराट्टी आणि पुतना शेट्टी हे राज्यपालांची भेट घेऊन अध्यक्ष के.प्रतापचंद्र शेट्टी यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली. तसेच सभागृहात आपल्याकडे बहुमत असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा असेही ते म्हणाले.
दरम्यान, कॉंग्रेसने असा आरोप केला आहे की, भाजप-जद (एस) आमदारांनी सभापतींवर सभागृहात घाईघाईने सभा घेणार होते. त्यामुळे भाजपने सभापतींना सभागृहात प्रवेश करण्यापासून रोखले.