४० हून अधिक स्वामीजींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू असतानाच राज्यातील विविध मठाधीशांनी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना पाठिंबा दर्शविला आहे. येडियुराप्पांना मुख्यमंत्री पदावरून हटविल्यास त्याचे गंभीर परिणाम भाजपला भोगावे लागतील, असा इशाराही स्वामीजींनी भाजप हायकमांडला दिला आहे. दरम्यान तुमकुरमध्ये सिद्धगंगा मठाच्या श्री सिद्धलिंग स्वामी यांच्या नेतृत्वात कर्नाटकातील मठाधीशांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची त्यांच्या अधिकृत निवासस्थानी जाऊन भेट दिली. यावेळी मठाधीशांनी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना पाठिंबा दर्शविला.
दरम्यान, मंगळवारी राज्यातील विविध मठाधीशांनी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची भेट घेतली होती. यामध्ये चित्रदुर्गमधील मुरुघमठाचे डॉ. शिवमूर्ती मुरुघ स्वामीजी, मादार चन्नय्या स्वामीजी, अथणीच्या गच्चीनमठाचे शिवबसव स्वामीजी, इळकलचे गुरुमहांतेश्वर स्वामीजी, शिरसीतील रुद्रदेवर मठाचे मल्लिकार्जुन स्वामीजी, चळकेरी येथील बसवकिरण स्वामीजी, रंभापुरी मठाचे स्वामीजी यांच्यासह अनेक मठाधीशांनी येडियुराप्पा यांची त्यांच्या बेंगळूरमधील ‘कावेरी’ या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली.