बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होताना पाहायला मिळत आहे. मंगळवारी राज्यात ३९५ नवीन बाधित रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यात एकूण बाधितांची संख्या ९,४०,१७० वर पोहोचली आहे. तर राज्यात तीन मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण मृतांची संख्या आकडा १२,२२३ वर पोहोचली आहे. राज्यात तीन मृत्यू पावलेले रुग्ण हे बेंगळूर मधील आहेत. त्यापैकी दोन रुग्ण अल्पवयीन होतो.
दरम्यान राज्यात उपचारानंतर ४१२ रूग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले. यासह राज्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९,२२,००४ वर पोहोचली आहे. मंगळवारपर्यंत कर्नाटकात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ५,९२४ इतकी आहे. यापैकी आयसीयूमध्ये १४८ रुग्ण दाखल आहेत.