हावेरीचे आमदार नेहरु ओलेकर आणि डियुरप्पा यांच्या कार्यकाळात उपसभापती आनंद ममानी नाराज
बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकातील बोम्माई यांच्या नेतृत्वाखालील भाजप मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या मंत्र्यांची अधिकृत यादी अद्याप जाहीर झाली नसली तरी काही आमदारांच्या समर्थकांनी त्यांच्या संबंधित नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी राज्याच्या विविध भागांमध्ये निदर्शने सुरू केली आहेत. दरम्यान, बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या नवनियुक्त मंत्रिमंडळचा आज दुपारी २.१५ वाजता शपथविधी होणार आहे.
हावेरीचे आमदार नेहरु ओलेकर यांच्या समर्थकांनी यावर नाराजी व्यक्त केली, तर बी. एस. येडियुरप्पा यांच्या कार्यकाळात उपसभापती असलेले आमदार आनंद ममानी यांनी ही सरकारला थेट इशारा दिली की, जोपर्यंत त्यांना मंत्री केले नाहीतर राजीनामा देऊ. मागच्या आठवड्याच्या सुरुवातीला, मामानी यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. यामध्ये त्यांनी असा दावा केला होता की ते एक ज्येष्ठ आमदार असून ते मतदारसंघातील लोकांसाठी काम करत आहेत.
दरम्यान आनंद यांनी बोलताना, “माझ्या अनुयायांनी मला सल्ला दिला आहे की मला मंत्री केले नाही तर मी उपसभापती पदाचा राजीनामा द्यावा. मी त्यांच्या सल्ल्याचे पालन करेन,” असे ते म्हणाले.