बेंगळूर/प्रतिनिधी
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे बुधवारी निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची बुधवारी प्राणज्योत मालवली. त्यांना श्रद्धांजली म्हणून कर्नाटक सरकारने होणारे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. तसेच सर्व शासकीय इमारतींवर असणारे झेंडे खाली घेऊन अर्ध्यावर फडकवत ठेवले आहेत. दरम्यान सदनही शोकसभेस संमती देईल.