बेंगळूर/प्रतिनिधी
लोकशाहीशी तडजोड केली जात असल्याचा आरोप करून मागील वर्षी सेवेतून राजीनामा दिलेले माजी आयएएस अधिकारी एस. ससीकांत सेंथिल यांनी रविवारी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला.
गेल्या वर्षी आयएएस पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर एनआरसी / सीएएविरोधी आंदोलनांसह सरकारविरूद्ध अनेक निषेधांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता तेव्हा ते दक्षिण कन्नड जिल्ह्याचे उपायुक्त होते.
दरम्यान शशिकांत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर अपलोड केलेल्या निवेदनात एकविसाव्या शतकात भारत आणि जगासाठी निर्माण झालेल्या आव्हानांची जाणीव कॉंग्रेस पक्षाला आहे आणि देशातील नागरिकांसाठी तोडगा काढण्यासाठी तयार आहेत, असे त्यांनी म्हंटले आहे.