नागरिकांना घाबरून न जाण्याचे केले आवाहन
मंगळूर/ प्रतिनिधी
माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेस नेते बी. जनार्दन पुजारी यांना कोरोनातून बरे झाल्यानंतर सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यांनतर त्यांनी नागरिकांना विषाणूची भीती बाळगण्याची गरज नाही. योग्य पौष्टिक आहार घेण्याची व त्याचबरोबर आरोग्याचीही चांगली काळजी घेण्याचे आवाहन केले. पौष्टिक आहार रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते,असेही ते यावेळी म्हणाले. याआधीही अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनाची लागण झाल्यानंतर पुजारी यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनातून मुक्त झाल्यावर पुजारी यांनी नागरिकांना मास्क घालावे व सर्व सार्वजनिक ठिकाणी शारीरिक अंतर राखण्याचे आवाहन केले.