बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना नियमांचे पालन करत मास्क घातला असतानाही बेंगळूर येथे पोलिसांनी त्यांना २५० रुपये दंड भरण्यास सांगितल्याचा आरोप मुडीगेरेचे आमदार एम. कुमारस्वामी यांनी केला आहे. शेषाद्रिपुरममध्ये गुरुवारी दुपारी ड्युटीवर असणाऱ्या पोलीस कर्मचार्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपच्या आमदाराने गृहमंत्री बसवराज बोम्मई यांना केली आहे.
कुमारस्वामी यांनी गृहमंत्र्यांना लिह्लेल्या आपल्या पत्रात असे म्हटले आहे की ही घटना गुरुवारी दुपारी १२.३० वाजता घडली. शेषाद्रिपुरम पोलीस स्टेशनशेजारील रहदारी अडवल्यामुळे जेव्हा आम्ही थांबलो तेव्हा मी भाड्याने घेतलेल्या कारमध्ये जात होतो. मुखवटा असतानाही पोलीस कर्मचाऱ्याने मला २५० रुपये दंड ठोठावला. मी दंड भरला. दरम्यान एक जबाबदार व्यक्ती म्हणून वाद न घालता तेथून निघून गेलो असे त्यांनी स्पष्ट केले.
कर्नाटक सरकार सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातलेल्या व्यक्तीकडून शहरी व ग्रामीण भागात अनुक्रमे २५० आणि १०० रुपये दंड आकारला जात आहे.