बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचे अलीकडेच मीडिया सल्लागार म्हणून एन. भृंगेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मीडिया सल्लागार एन. भृंगेश यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
एन. भृंगेश हे माहिती विभागातील सेवानिवृत्त अधिकारी आहेत आणि मुख्यमंत्र्यांचे आधीचे सल्लागार महादेव प्रकाश यांनी वैयक्तिक कारण देत पदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त जागी एन. भृंगेश यांची मीडिया सल्लागार म्हणून नेमणूक केली गेली.