बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी . एस. येडियुरप्पा यांचे राजकीय सचिव आणि आमदार एम. पी. रेणुकाचार्य यांना मंगळवारी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. आमदार रेणुकाचार्य यांनी कोरोना चाचणी केली असता त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
याविषयी रेणुकाचार्य यांनी त्यांच्या तब्येतीत काही बदल पाहायला मिळाल्याने कोरोना चाचणी करून घेतली. चाचणी अंतर अहवाल पिझिटिव्ह आल्याचे म्हंटले आहे.
रेणुकाचार्य यांनी गेल्या चार-पाच दिवसात त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना चाचणी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मंगळवारी रेणुकाचार्य यांना बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, कायदामंत्री जे. सी. मधुस्वामी, कॉंग्रेसचे ज्येष्ठ आमदार एच के. पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.