बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी बुधवारी गुलबर्गा आणि विजापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गुलबर्गा दौर्यावेळी सैन्यदलाचे कौतुक केले. नागरी प्रशासनाने उत्तर कर्नाटकातील पूरग्रस्त भागामध्ये मदत कार्यात वेळेवर सहकार्य करत नागरिकांना मदत केली आहे.
पूर परिस्थिती दरम्यन हैदराबादच्या एमईजी, मराठा एलआय सेंटर आणि बाइसन विभागातील दहा अभियंता टास्क फोर्स (ईटीएफ) टीमने विजापूर, गुलबर्गा, यादगीर आणि रायचूर या चार जिल्ह्यांत मदत कार्यात सक्रियपणे सहभागी आहेत.
पूरग्रस्त भागातील बचाव कार्यासाठी बेंगळूर, बेळगाव आणि हैदराबाद येथून मदत केल्यामुळे पुरबाधित स्थानिकांना बाहेर काढण्यात यश आले आणि या भागातील लोकांचे जीव वाचू शकले.