म्हैसूर/प्रतिनिधी
म्हैसूर विद्यापीठाने (यूओएम) कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी संजीव कुमार यांना “MGNREGA – Law Rights, Process – Sustainable Livelihood – A Critical या प्रबंधासाठी त्यांना पीएचडी प्रदान केली.
१९८६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी कुमार यांनी २०१५ मध्ये पीएचडी प्रबंध सुरू केला होता आणि त्याने इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज (यूओएम) येथे पीएचडी केली. संजीव कुमार यांना २०१४ मध्ये पीएचडी करण्यासाठी सरकारकडून मंजुरी मिळाली.
सन २०१७ मध्ये, भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) संजीव कुमार यांची कर्नाटकसाठी मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती केली.
दरम्यान, आयएफएस अधिकारी मनोज राजन यांना देखील यूओएमने पीएचडी देखील प्रदान केले. राजन यांनी ‘देशातील कृषी बाजार सुधारणा व तंत्रज्ञानाची भूमिका’ या विषयावर पीएचडी केली. राजन सध्या कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती निगरानी केंद्राचे (केएसएनडीएमसी) संचालक म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांनी साडेचार वर्षांपूर्वी संशोधन कार्याला सुरुवात केली होती.