बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत शिक्षकांची कोरोना चाचणी केली असता त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अहवालानंतर जिल्हा प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले असून पुढील काही दिवस वर्गात शिक्षण घेणाऱ्या सर्वांना पुढील काही दिवस होम क्वारंटाईन होण्याचे निर्देश दिले आहेत.
विजापूरचे उपायुक्त पी. सुनील कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय उच्च प्राथमिक विद्यालय, बोलेगाव गाव येथील शिक्षकामध्ये कोणतीही लक्षणे नसताना त्याचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. दरम्यान आज शाळा स्वच्छ केली जात आहे. ज्या विद्यार्थ्यांना या शिकहुसकाने शिकविले आहे ते सहावी आणि सातवीच्या (विद्यागाम) वर्गातील आहेत. त्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची व इतर शिक्षकांची चाचणी करण्याचे मी जिल्हा पाळत ठेव अधिकारी यांना निर्देश दिले आहेत, असे ते म्हणाले.
जिल्हा प्रशासनाने शाळेतील संपर्कात आलेले शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांवर आरोग्य अधिकारी देखरेख ठेवतील. जिल्ह्यात १७ नोव्हेंबरपासून (महाविद्यालये पुन्हा उघडल्यानंतर) एकूण २१,७४९ नमुन्यांची चाचणी घेतली. त्यापैकी ६८ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निषपन्न झाले आहे. दरम्यान, सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये आतापर्यंत २८ शिक्षकांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती उपायुक्तांनी दिली.