बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात एसएसएलसीचा परीक्षेचा दुसरा पेपर गुरुवारी २२ रोजी झाला. एसएसएलसी परीक्षेच्या दुसऱ्या पेपरनंतर शुक्रवारी राज्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी एसएसएलसीचा निकाल १० ऑगस्टपर्यंत जाहीर होईल असे सांगितले.
पत्रकारांशी बोलताना मंत्री म्हणाले, शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ च्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सोमवारी बोलावलेल्या बैठकीनंतर घेण्यात येईल, असे ते म्हणाले. खासगी शाळा शुल्काचा मुद्दा उच्च न्यायालयासमोर आहे आणि 2 ऑगस्ट रोजी या खटल्याची सुनावणी होईल, असे ते म्हणाले.