बेंगळूर/प्रतिनिधी
इयत्ता ९ वी ते १२ वीचे ऑफलाईन वर्ग सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी राज्यात २३ ऑगस्टपासून ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू होणार असल्याची माहिती दिली.
कर्नाटक सरकारने इयत्ता ९ वी आणि १० वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन वर्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इयत्ता १२ वी चे वर्गही २३ ऑगस्टला सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला.
दरम्यान, प्राथमिक शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत स्थगित करण्यात आला आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि संसर्ग पसरण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेतला आहे.
तज्ज्ञ, मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर बोम्माई म्हणाले, “आम्ही दोन टप्प्यांत शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. “पहिल्या टप्प्यात, ९-१२ चे वर्ग २३ ऑगस्टपासून अटींच्या अधीन सुरू होतील. विद्यार्थ्यांच्या दोन तुकड्या असतील – पहिल्या तुकडीचे वर्ग तीन दिवसांसाठी असतील आणि दुसरी तुकडीचे वर्ग आणखी तीन दिवस.