बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सोमवारी युनायटेड किंगडममधून परत येणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याची माहिती दिली आहे. दरम्यान प्रवाशांनी मोबाईल बंद केल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
प्रशासनाला सहकार्य न केल्यास त्यांच्याविरोधात पोलीस कारवाई करू शकतात असेही मंत्री म्हणाले. मी युकेहून परत आलेल्यांना जबाबदार नागरिक म्हणून आमच्याशी सहकार्य करण्याची विनंती करतो. तुमची कोरोना चाचणी करावी लागेल. मंत्री सुधकर यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी जर तपासणी केली गेली नाही आणि तुमचा फोन बंद करण्यात आला तर तो खर्या अर्थाने गुन्हा आहे, असे मंत्री सुधाकर म्हणाले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनहून परत आलेल्या सुमारे ३०० लोकांचा शोध लागला आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नवीन विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. मंत्री सुधाकर यांनी कॅबिनेट बैठकीनंतर आपण गृहमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासमवेत बैठक घेतली.
दरम्यान युकेहून परत आलेल्यांचा मागोवा घेतला जाऊ शकला नाही, त्यांचे फोन बंद केले गेले आहेत आणि माध्यम आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेल्या विनंत्यांना प्रतिसाद देत नाहीत, असे ते म्हणाले.