बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पदावरून पायउतार होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येडियुरप्पा यांच्या जागी कोण असेल?; याबाबत खलबतं सुरु झाली आहेत. पक्षश्रेष्ठी आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगतील अशी शक्यता आहे. दरम्यान, कर्नाटक भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं सध्या चित्र आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचं वाढतं वय पाहता नेतृत्व बदलाचा विचार सुरु असल्याचं बोललं जात आहे. आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. आता मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पदावरून पायउतार होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येडियुरप्पा यांच्या जागी कोण असेल?; याबाबत खलबतं सुरु झाली आहेत. मात्र अद्याप त्यावर अधिकृतपणे सांगण्यात आलेलं नाही. मात्र नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव आज संध्याकाळपर्यंत जाहीर होईल, असे संकेत मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि खणन मंत्री एम. आर. निरानी यांचं नाव आघाडीवर आहे.
“नेतृत्व बदलावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. आज संध्याकाळपर्यंत याबाबत सर्व चित्र स्पष्ट होईल. मी पक्षश्रेष्ठींकडून नावाची आशा करतो. तुम्हाला लवकरच याबाबत माहिती मिळेल. दलित मुख्यमंत्री नियुक्तीबाबत पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतला आहे. मला कोणतीच चिंता नाही”, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिले आहेत. दरम्यान बेंगळूरमध्ये प्रथम मुख्यमंत्र्यांनी पदावरून पायउतार होण्याचे संकेत दिले होते.