बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी गेल्या वर्षी राज्यात त्यांचे सरकार पाडण्यासाठी मादक पदार्थांची तस्करी केली गेली होती असा दावा केला आहे.
ड्रग माफिया आणि कन्नड फिल्म इंडस्ट्री यांच्यात असलेल्या संबंधांच्या चालू असलेल्या चौकशीला उत्तर देताना कुमारस्वामी यांनी जेव्हा मी जद (एस) – कॉंग्रेस सरकारचा मुख्यमंत्री होतो तेव्हा मी ड्रग्सच्या तस्करीविरूद्ध कारवाई करण्याचा प्रयत्न केला. काही तस्कर श्रीलंकेत पळून गेले. त्यामुळे अमली पदार्थांची तस्करी, क्रिकेट सट्टेबाजी, डान्स बार आणि पबमधून मिळणार्या पैशाचा वापर करून माझे सरकार पाडण्यात आले, असा आरोप त्यांनी केला आहे.
कुमारस्वामी यांनी लहान, लहान मुलांनी अशा वाईट माफियांना बळी पडू नये, असे म्हटले होते, जे माफिये यामध्ये दोषी आढळतील त्या सर्वांवर कडक कारवाई करण्याची विनंती राज्य सरकारला केली आहे.