बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश गौडा खून खटल्याच्या चौकशीत सरकारकडून कोणताही हस्तक्षेप होणार नाही असे म्हंटले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) विनय कुलकर्णी यांच्या विरुद्ध भक्कम पुरावे सापडल्यानंतर अटक केली आहे. या प्रकरणावरुन भाजपवर राजकारण करण्याचा कॉंग्रेसचा आरोप निराधार असल्याचे त्यांनी प्रदेश भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत भाग घेण्यापूर्वी सांगितले. तपास एजन्सी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहे. या तपासात प्रशासनाची कोणतीही भूमिका नाही.
योगेश गौडा यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी आमची इच्छा आहे. विनय कुलकर्णी यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की ही केवळ अफवा आहे.
ग्राम विकास आणि पंचायत राजमंत्री के एस.ईश्वरप्पा यांनी याआधी सत्तेचा वापर करून गुन्हे लपवण्याचा प्रयत्न करत पण आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे अशा लोकांना राजकारणात स्थान नाही. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश देण्याचे कोणतेही कारण नाही.