बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात मुख्यमंत्री बदल्याच्या चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळ आणि पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार विधानसौधमध्ये सकाळी १०.३० वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, तर दुपारी ४ वाजता पक्षाच्या खासदारांची बैठक मुख्यमंत्री निवासी कार्यालय कृष्णा येथे बोलविण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात कॉर्पोरेट्स आणि बोर्डाच्या नियुक्तीनंतर येडियुरप्पा एकाच दिवसात दोन बैठक बोलवण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली असून, पुन्हा एकदा नेतृत्वातील बदलांच्या अफवांना उधाण आले आहे. तथापि, राज्य नेतृत्व या अंदाजांना नकार देत आहे. येडियुरप्पा यांनी बुधवारी यांनी, मी उर्वरित मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचे म्हंटले होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री सी.एन. अश्वथनारायण यांनी येडियुरप्पा मुख्यमंत्री म्हणून या पदावर कायम राहतील, असे ते पुन्हा म्हणाले.
उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही वारंवार सांगत आहोत की राज्यात नेतृत्व बदल होणार नाही. येडियुरप्पा मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील. आमचे नेते बदलणार नाहीत. येडियुरप्पा हे आमचे नेते आहेत आणि कायम राहतील. मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव खासदार रेणुकाचार्य यांनी येडियुरप्पा मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील हे आमच्या राष्ट्रीय व राज्य नेतृत्वाने स्पष्ट केले आहे, असे ते म्हणाले.