नवीन वेळापत्रक 4 मे रोजी होणार जाहीरः शिक्षणमंत्री एस.सुरेशकुमार
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाच्या संकटछायेत 2019-2020 या शैक्षणिक वर्षातील दहावी परीक्षा देखील लांबणीवर टाकण्यात आली होती. मात्र 3 मे पर्यंतचा लॉकडाऊनचा कालावधी पुर्ण झाल्यानंतर दि. 4 मे रोजी एसएसएलसी परीक्षेबाबतचा निर्णय जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षण मंत्र्यांनी दिली आहे. 27 मार्च ते 9 एप्रिल दरम्यान एसएसएलसी परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने दोन वेळा लॉकडाऊनचा टप्पा देखील वाढविण्यात आला परिणामी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र शिक्षणमंत्री एस.सुरेशकुमार यांनी 4 मे रोजी एसएसएलसी परीक्षेबाबतचा निर्णय जाहीर करत नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.