बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात एकाच दिवसात सर्वात जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आणि मृत्यूची नोंद झाल्यानंतर एक दिवसानंतर मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी बेंगळूरमधील ज्येष्ठ मंत्री, खासदार आणि सरकारी अधिकाऱयांची भेट घेऊन कोरोनाच्या सद्य परिस्थितीवर चर्चा केली. कर्नाटकात काल गुरुवारी ४ हजाराहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर शंभर पेक्षा अधिक बाधित रुग्णांचा मृत्य झाला झाला आहे.
यावेळी या बैठकीला उपमुख्यमंत्री सी.एन. अश्वथ नारायण, गृहमंत्री बसवराज बोम्माई, महसूलमंत्री आर.अशोक, गृहनिर्माणमंत्री व्ही. सोमाण्णा, केंद्रीय रसायन व खत मंत्री सदानंद गौडा, खासदार तेजस्वी सूर्य, आणि राज्याचे मुख्य सचिव टी. एम. विजयभास्कर आदी उपस्थित होते.