उच्च शिक्षणमंत्र्यांची घोषणा
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोनाचा प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर पदवी शिक्षणाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा वगळता कॉलेजच्या सर्व परीक्षा रद्द केल्याची घोषणा कर्नाटक राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री अश्वत्थ नारायण यांनी केली. यामुळे राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
यंदा पदवीच्या केवळ अंतिम वर्षाची परीक्षा होणार आहे. बाकी सर्व वर्षाच्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण काढून त्यांनी नवीन वर्गात प्रवेश दिला जाणार असल्याचे मंत्री अश्वत्थ नारायण यांनी स्पष्ट केले. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. कमी गुण मिळाले असतील ऐच्छिक परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचे अश्वत्थ नारायण यांनी सांगितले.राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षा जरी होणार असल्यातरी कोरोना संदर्भातील गांभीर्य वाढल्यास बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.