बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोनाचा वेग वाढला आहे. राज्यात दररोज वाढणारी कोरोनाची संख्या प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली आहे. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी सरकारने व्ह्यूवरचना आखली आहे. यासाठी सरकारने तसे आदेशही जारी केले आहेत. राज्यात बुधवारी कोरोनाची संख्या वाढली होती. आत राज्यात बाधितांची संख्या वेगाने वाढली. राज्यात गुरुवारी कोरोना रुग्णांची संख्या २५०० च्या वर गेली. गुरुवारी राज्यात कोरोनाचा वेग वाढल्याने राज्यात २,५२३ रुग्णांची भर पडली.
आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात गुरुवारी २,५२३ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, राज्यातील विविध जिल्ह्यातून १,१९२ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले आहेत. गुरुवारी कोरोनामुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे. वाढती कोरोना रुग्णांची संख्या राज्याची चिंता वाढवणारी आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन आरोग्य मंत्र्यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.
दरम्यान राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. बेंगळूरमध्ये प्रशासन कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक अंमलबजावणी करत आहे. जिल्ह्यात प्रशासनाने अनेक कार्यक्रमांवर मर्यादा घातली आहे. तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची रक्कमही वाढवली आहे. दरम्यान गुरुवारी जिल्ह्यात १,६२३ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते.तर ६६५ रुग्ण कोरोनावर मत करत रुग्णालयातून घरी परतले आहेत. बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,५६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.