बेंगळूर/प्रतिनिधी
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा कडक निर्बंध राबविण्याची शक्यता आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दरम्यान कर्नाटकात शुक्रवारी कोरोनाचे रुग्ण वाढले. राज्यात गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली. राज्यात शुक्रवारी ५७१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर राज्यातील विविध जिल्ह्यातून सर्वाधिक ६४२ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णायातून घरी परतले. तर ४ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५,५०१ इतकी आहे. राज्यात आतापर्यंत १२,३२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सर्वाधिक संख्याही बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. तसेच सध्या उपचारात असणाऱ्या रुग्णांची सर्वाधिक संख्या बेंगळूरमध्येच आहे. दरम्यान शुक्रवारी जिल्ह्यात ३६८ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर सर्वाधिक ४९८ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच जिल्ह्यात सध्या सक्रिय प्रकरणांची संख्या देखील ३,७५४ वर पोहोचली आहे. दरम्यान शहरी जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,४६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.