बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात शनिवारी १५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे राज्यातील एकूण कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांची संख्या १२ हजाराच्यावर गेली आहे. राज्यात शनिवारपर्यंत १२,००४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी राज्यात १,१५२ नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर २,१४७ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. राज्यात सध्या १४,३७० रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. जिल्ह्यात शनिवारी ५८६ रुग्णांची नोंद झाली आहे. बेंगळूरमध्ये सक्रिय प्रकरणांची संख्या ९,४४० आहे. जिल्ह्यात शनिवारी १,६१४ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर जिह्यात १० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ४,२६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.