बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. राज्यात चोवीस तासांत जवळपास अडीच हजार नवीन रुग्ण वाढले आहेत. मंगळवारी कर्नाटकमध्ये २४९६ नवीन कोरोना रूग्णांची भर पडली आहे. यासह आता एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४४०७७ वर पोहोचली आहे. यापैकी २५८३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर १७३९० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी दिलासादायक बातमी म्हणजे राज्यात ११४२ रूग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तर आरोग्य विभागानेही आणखी 87 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. राज्यात एकूण ८४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आयसीयूमध्ये 540 रुग्ण दाखल आहेत. बेंगरूळमध्ये मंगळवारी १२६७ रुग्ण सापडले आहेत.