बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून दररोज नवीन कोरोना रुग्णांची संख्या ८००-९०० ने वाढत आहे. सोमवारी राज्यात बाधितांच्या संख्येत घट झालेली पाहायला मिळाली. सोमवारी राज्यात ४९६ बाधितांची नोंद झाली आहे. तर ४ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ९,६४९ इतकी आहे. तसेच ७९७ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे १२,१४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान राज्यात आतापर्यंत बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. सोमवारी जिल्ह्यात २८२ कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच वेळी जिल्ह्यात ३७४ रुग्ण कोरोनावर विजय मिळावीत रुग्णालयातून घरी परतले. दरम्यान जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ५,९७४ इतकी आहे तसेच शहरी जिल्ह्यात आतापर्यंत ४,३४८ रूग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.